![](https://static.wixstatic.com/media/138bf0_f6134f3185fb425689021861e7b4b1d5~mv2.jpg)
nहरवले मी पुन्हाnमेघ दाटुनी येताnभासला मज का नवाnजरी ऋतू जुनाच होताnnथेंबा थेंबात त्याnहोता नवा स्पर्शnघेऊनी आला नव्यानेnहृदयी जुना हर्षnnओलाव्यात त्या पुन्हाnमन चिंब झालेnविसरूनी भान साऱ्याचेnपुन्हा एकदा न्हालेnnहृदयी वसले होते कोणीnविरहात ज्याच्या त्रासलेलेnह्या सरींमध्ये मजलाnत्याचे अस्तित्व भासलेले